May 4, 2025 1:49 PM May 4, 2025 1:49 PM

views 8

बद्रीनाथ धामची कवाडं विधिवत उघडली

उत्तराखंडमधलं चमोली जिल्ह्यात, आज बद्रीनाथ धामची कवाडं विधिवत उघडण्यात आली. यामुळे आता केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह चारही धामांची कवाडं भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत. चारधाम यात्रेसाठी रेल्वे मंत्रालयातर्फे भारत गौरव डिलक्स रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या रेल्वेनं बद्रीनाथ, जोशीमठ, ऋषिकेश, पुरी, कोणार्क, रामेश्वरम आणि द्वारका तसंच काशी विश्वनाथ, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी प्रवास करता येणार आहे. ही रेल्वे या महिन्याच्या २७ तारखेला दिल्लीच्या सफदरजंग रेल्वे स्थानकावरून सुटून सतरा द...

May 3, 2025 8:19 PM May 3, 2025 8:19 PM

views 9

बद्रीनाथ धामची कवाडं उद्या पहाटे सहा वाजता उघडण्यात येणार

उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यातल्या बद्रीनाथ धामची कवाडं उद्या पहाटे सहा वाजता विधिवत उघडण्यात येतील. धार्मिक प्रथेनुसार, आदि गुरु शंकराचार्य यांच्या सिंहासनासह भगवान उद्धव आणि गरुड पालखी आज बद्रीनाथ धामला दाखल झाल्या. भगवान कुबेरांची पालखी बामनी गावातल्या नंदा देवी मंदिरात मुक्कामी असेल. बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर समितीने १५ क्विंटर झेंडुच्या फुलांनी मंदिराची सजावट केली आहे.

November 18, 2024 10:02 AM November 18, 2024 10:02 AM

views 12

हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बद्रीनाथ धामचे दरवाजे बंद

उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील श्री बद्रीनाथ धामचे दरवाजे कडक हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर काल रात्री नऊ वाजता बंद करण्यात आले. त्यानिमित्त काल बद्रीनाथ मंदिर १५ क्विंटल झेंडूच्या फुलांनी सजवण्यात आले होते. मंदिराच्या सिंहद्वार संकुलात गढवाल स्काऊट बँडतर्फे वंदन करण्यात आलं. त्या भक्तिमय सुरांनी संपूर्ण बद्रीनाथ परिसर दुमदुमून गेला होता.   शनिवारी चमोलीचे जिल्हा दंडाधिकारी संदीप तिवारी यांनी बद्रीनाथ धामला भेट देऊन मंदिर बंद करण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतला. यासोबतच त्यांनी संपूर्ण प्रवासाद...