August 5, 2024 1:38 PM
23
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत. टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज ...