December 28, 2024 8:02 PM December 28, 2024 8:02 PM

views 12

बॅडमिंटन खुल्या स्पर्धेत उपांत्य फेरीत लक्ष्य सेनचा पराभव

किंग्ज कप आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खुल्या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा पराभव झाला. उपांत्य फेरीच्या आज झालेल्या सामन्यात चीनच्या हू झेन ॲन यानं त्याला १९-२१,१९-२१ असं पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

December 12, 2024 7:25 PM December 12, 2024 7:25 PM

views 20

बॅडमिंटन वर्ल्ड टूरच्या अंतिम फेरीत भारतीय महिला जोडीचा तिसऱ्या फेरीत प्रवेश

चीनच्या हांगझोऊ येथे सुरू असलेल्या बॅडमिंटन वर्ल्ड टूर फायनलमध्ये ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीनं मलेशियाच्या परली टॅन आणि थिनाह मुरलीधरन या जोडीचा पराभव करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.   भारतीय जोडीनं आज दुसऱ्या गटातील सामन्यात मलेशियाचा २१-१९, २१-१९ असा सरळ गेममध्ये पराभव केला. या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्त्व करणारी ट्रीसा आणि गायत्री यांची जोडी ही एकमेव जोडी आहे.

December 1, 2024 8:56 AM December 1, 2024 8:56 AM

views 9

बॅडमिंटनमध्ये भारताच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

सय्यद मोदी भारतीय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत, भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सेननं जपानच्या शोगो ओगावाचा २१-८, २१-१४ असा पराभव केला. अंतिम सामन्यात लक्ष सेनची लढत सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहशी होईल. दरम्यान भारताच्या पी व्ही सिंधूनंही महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तिनं भारताच्याच उन्नती हुडाचा २१-१२, २१-९ असा पराभव केला. अन्य एका स्पर्धेत, ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद पुलेला या भारतीय जोडीनंही महिला दुहेरीच्या अंतिम फे...

November 30, 2024 1:50 PM November 30, 2024 1:50 PM

views 12

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये होणार

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा उपांत्य सामना आज लखनौमध्ये खेळला जाणार आहे. महिला एकेरीमध्ये ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधु हिचा सामना उन्नती हुडा हिच्याशी होईल. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनची लढत जपानच्या शोगो ओगवा याच्याशी तर प्रियांशु राजावत याची लढत सिंगापोरच्या जिया हेंग जेसन तेह याच्याशी होणार आहे. काल झालल्या सामन्यात सिंधुने चीनच्या दाई वांग हिचा तर लक्ष्य सेनने मीराबा लुआंग मैसनाम याचा पराभव केला होता. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्तो या जोडीने चीनच्या झोऊ झी होंग आण...

November 29, 2024 7:33 PM November 29, 2024 7:33 PM

views 21

सैद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोघे सैद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. सिंधूने चीनच्या दाई वांगचा २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्याच मिराबा लुवांग मासनमचा २१-८, २१-१९ असा पराभव केला. महिला दुहेरीत ट्रेसा जॉली आणि गायत्री गोपीचंद, या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला.

November 26, 2024 8:27 PM November 26, 2024 8:27 PM

views 23

लखनौ इथं सैद मौदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा सुरु

लखनौ इथं आजपासून सुरू झालेल्या सैद मौदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे आघाडीचे भारतीय खेळाडू सहभाग घेत आहेत. या स्पर्धेचे सर्व सामने बाबू बनारसी दास मैदानावर होणार आहेत. पुढच्या महिन्याच्या १ तारखेला या स्पर्धेचा समारोप होईल. दरम्यान, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतले सुवर्णपदक विजेते बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे.

November 21, 2024 8:13 PM November 21, 2024 8:13 PM

views 11

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनेचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये  पुरुष एकेरीत लक्ष्य सेनेनं  डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा २१-१६,२१-१८ असा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकिरेड्डी या भारतीय जोडीनं डेन्मार्कच्या जोडीचा २१- १९, २१ -१५ असा पराभव  करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.    आज दुपारी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत ट्रेस जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला चीनच्या खेळाडूंकडून पराभवाचा सामना करावा लागला.  

November 3, 2024 1:27 PM November 3, 2024 1:27 PM

views 13

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिनं हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याचा २३-२१, २१-१८ असा थेट गेम्समध्ये पराभव केला. तिचा अंतिम फेरीचा सामना आज रात्री डेन्मार्कच्याच, सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी होणार आहे.

August 25, 2024 1:37 PM August 25, 2024 1:37 PM

views 14

भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं

चीनमध्ये चेंगडूू इथं सुरू असलेल्या आशिया १७ आणि १५ खालील कनिष्ठ गट बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या तन्वी पात्रीनं १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. तन्वीने अंतिम लढतीत व्हिएतनामच्या गुयेन थि थू ह्युगेनचा २२-२०, २१-११ असा पराभव केला.   १७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत, ग्यान दत्तूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या रादिथ्या बायु वारदानाकडून त्याला ९-२१, २१-१३, २१-१३ असा पराभव पत्करावा लागला.

August 5, 2024 1:38 PM August 5, 2024 1:38 PM

views 19

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठी सामना

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताच्या लक्ष्य सेनची कांस्यपदकासाठीची लढत मलेशियाच्या झी जिया ली याच्याशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६ वाजता हा सामना होईल. भारताला या स्पर्धेतलं चौथं पदक मिळवून देण्यासाठी लक्ष्य सेन प्रयत्नशील असेल. याशिवाय नेमबाजी स्पर्धेत स्कीट मिश्र सांघिक प्रकारात महेश्वरी चौहान आणि अनंतजीत सिंह नरुका आज लक्ष्याचा वेध घेणार आहेत. टेबल टेनिस सांघिक प्रकारात उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान निश्चित करण्यासाठी श्रीजा अकुला, मनिका बत्रा आणि अर्चना कामत आज ...