March 5, 2025 9:52 AM

views 28

भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश

भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रान्समधील ऑर्लियन्स इथं झालेल्या दोन्ही पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. श्रीकांतनं दोन सामन्यांमध्ये अनुक्रम मॅड्स क्रिस्टोफरसनचा आणि अर्नॉड मर्कलेचा असा पराभव केला. शंकर सुब्रमणियम यानेही मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत, तान्या हेमंतने तिचा पहिला सामना जिंकला पण दुसरा सामना गमावला. तिसऱ्या मानांकित आकर्शी कश्यपलाही पराभव पत्करावा लागला.

February 14, 2025 2:45 PM

views 31

बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचं आव्हान संपुष्टात

आशिया मिश्र सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारतीय खेळाडूंनी चांगली लढत दिली मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांचा जपानच्या हिरोकी मिदोरिकावा आणि नात्सु सैतो यांच्याकडून १३-२१, २१-१७, १३-२१ असा पराभव झाला.   महिला एकेरीत भारताच्या मालविका बनसोड हिचाही टोमाका मियाझाकीविरुद्धच्या सामन्यात १२-२१, १९-२१ असा सरळ गेममध्ये पराभव झाला. पुरुष एकेरीत एच.एस प्रणॉय याने जपानच...

February 9, 2025 1:39 PM

views 24

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताचा सामना रशिया सोबत

मुंबई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत आज प्रार्थना थुंबारे आणि एरियन हार्टोनो यांच्या जोडीचा सामना रशियाच्या अमिना अंशबा आणि एलेना प्रिडांकिना या जोडीशी होणार आहे.   प्रार्थना आणि अरियाना या भारत-डच जोडीनं सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. महिला एकेरीच्या काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  भारताच्या माया राजेश्वरनचं आव्हान मात्र संपुष्टात आलं.

January 17, 2025 8:19 PM

views 21

बॅडमिंटन : महिलांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या महिलांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू हिचा इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिनं ९-२१,२१-१९,१७-२१ असा पराभव केला. नवी दिल्लीत हा सामना झाला.  

January 16, 2025 8:38 PM

views 22

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही सिंधू, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी उपांत्यपूर्व फेरीत दाखल

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अग्रनामांकित पी. व्ही सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिनं जपानच्या मनामी सुझुझचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात सिंधूनं सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. सिंधूचा पुढचा सामना इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मरिस्का तांजग बरोबर उद्या होणार आहे. महिलांच्या दुहेरी सामन्यात भारतीय जोडी तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनाप्पा यांचा जपानच्या जोडीनं पराभव केला.   पुरुषांच्या दुहेरीत भारतीय जोडी सात्विकसाईरा...

January 15, 2025 8:21 PM

views 15

बॅडमिंटन : महिला एकेरीत भारताच्या अनुपमा उपाध्याय हिचा उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या अनुपमा उपाध्याय हिने उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने पहिल्या फेरीत भारताच्याच रक्षिता रामराज हिचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारताच्या मालविका बनसोड आणि आकर्शी कश्यप तर पुरुष एकेरीत भारताचे प्रियांशू राजावत आणि एच. एस. प्रणॉय यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

January 14, 2025 9:13 PM

views 22

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी. व्ही. सिंधूचा विजय

इंडिया ओपन २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने चायनीज तैपेईच्या शुओ यून संग हिचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे.   पुरुष एकेरीत बीडब्ल्यूएफ सुपर ७५९ स्पर्धेत किरन जॉर्जने युशी तनाका याला धूळ चारली.    मिश्र दुहेरीत ध्रुव कपीला आणि तनिषा क्रॅस्टो या जोडीनं यीन हुई सू आणि चेंग कुआन चेन यांचा पराभव करत दुसऱ्या फेरीत  प्रवेश केला.     भारताच्या किदम्बी श्रीकांतने स्पर्धेतून माघार घेतली आहे. 

January 11, 2025 8:45 PM

views 20

बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा पराभव

क्वालालंपूर इथं सुरु असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला दक्षिण कोरियाच्या सेओ संग-जे आणि किम वोन-हो यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. कोरियन जोडीनं त्यांचा १०-२१, १५-२१ असा पराभव केला.    तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीत, भारतीय जोडीनं मलेशियाच्या येव सिन ओंग आणि ई यी तेओ यांच्यावर २६-२४ आणि २१-१५ असा विजय मिळवला.

January 11, 2025 9:49 AM

views 14

मलेशियात आज पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारताचा कोरियाच्या जोडीशी सामना

मलेशियात सुपर थाउजंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत, पुरूषांच्या दुहेरीच्या उपांत्य फेरीत सात्विकसाईराज रेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीचा सामना आज कोरियाच्या जोडीशी होणार आहे.   भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी हा सामना होणार आहे. तत्पुर्वी उपउपांत्य फेरीत या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा २६-२४, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला

January 9, 2025 3:12 PM

views 26

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत बॅडमिंटनपटू एच. एस.प्रणॉय आणि मालविका बनसोड यांनी त्यांच्या गटांमध्ये उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रणॉयनं कॅनडाच्या ब्रायन यांगवर २१-१२,१७-२१,२१-१५ असा पराभव केला. मालविकानं मलेशियाच्याच गोह जिन वेईचा २१-१५, २१-१६ असा पराभव केला.   मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांनी दक्षिण कोरियाच्या संग ह्यून को आणि हाय वोन एओम यांचा २१-१३, २१-१४ असा पराभव केला. मिश्र दुहेरीतल्या दुसऱ्या सामन्यात सतीश आणि आद्या यांनी भारताच्याच आशित सूर्या आणि अम...