May 8, 2025 3:01 PM May 8, 2025 3:01 PM

views 4

बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकुच

तैपैयी इथं सुरु असलेल्या खुल्या सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची आगेकुच सुरु आहे. पुरुषांच्या एकेरीत किदंबी श्रीकांत भारतीय खेळाडू शंकर सुब्रमण्यम याचा पराभव करत दुसऱ्या फेरीत पोहोचला आहे.  महिलांच्या एकेरीत उन्नती हुडानं अनुपमा उपाध्यायचा पराभव करत दुसरी फेरी गाठली आहे.

May 2, 2025 11:36 AM May 2, 2025 11:36 AM

views 18

सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारताची इंग्लंडवर ३-२ नं मात

चीनमध्ये सुरू असलेल्या सुदीरमन करंडक बँडमिंटन स्पर्धेत भारतानं इंग्लंडवर ३-२ अशी मात केली. भारताच्या अनुपमा उपाध्यायनं महिला एकेरीत इंग्लंडच्या खेळाडूला पराभूत केलं तर पुरूषांच्या एकेरीत सतीश कुमार करुणाकरण यानंही इंग्लंडच्या खेळाडूला पराभूत केलं. मात्र डेन्मार्क आणि इंडोनेशिया विरूद्धचे सामने हरल्यानं भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्यात अपयश आलं.

April 11, 2025 2:57 PM April 11, 2025 2:57 PM

views 19

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात

चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. भारताचा ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांना मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. हाँगकाँगच्या तांग चुन मान आणि त्से यिंग सुएट या जोडीने त्यांचा २२-२०, २१-१३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. 

April 10, 2025 1:46 PM April 10, 2025 1:46 PM

views 13

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चीनमध्ये निंगबो इथं सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची मिश्र जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी चीनी तैपेच्या हाँग वेई ये आणि निकोल गोंझालेस चान यांचा १२-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला. तसंच आशिथ सूर्या आणि अमृता प्रमुथेश या जोडीचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला.    महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पी.व्ही. सिंधूला जपानच्या अकाने यामागुची कडून ११-२१, २१-१६, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व ...

April 10, 2025 11:04 AM April 10, 2025 11:04 AM

views 17

भारतीय खेळाडूंचा बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश

बॅडमिंटनमध्ये, भारताच्या पीव्ही सिंधू, प्रियांशु राजावत आणि किरण जॉर्ज यांनी चीनमधील निंगबो इथे झालेल्या बॅडमिंटन आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती सिंधू आज सकाळी महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत -  जपानच्या अकाने यामागुची-शी सामना करणार आहे .

March 19, 2025 1:40 PM March 19, 2025 1:40 PM

views 13

Badminton : दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंदचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

स्वित्झर्लंडमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला दुहेरी गटात भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या फेरीत त्यांनी स्वित्झर्लंडच्या ॲलाईन मुलर आणि नेदरलँड्सच्या केली व्हॅन बुइटेन या जोडीचा २१-१६, २१-१७ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या उपउपांत्यपूर्व फेरीत ट्रिसा आणि गायत्रीचा सामना सेलिन हब्श आणि अमेली लेहमन या जर्मन जोडीशी होईल. महिला एकेरी प्रकारात आज संध्याकाळी भारताची पी. व्ही. सिंधू हिची लढत डेन्मार्कच्या ज्युली डावल जेकोबसेन हिच...

March 14, 2025 2:04 PM March 14, 2025 2:04 PM

views 11

Badminton : भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या विजेतेपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीनं महिला दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या काँग ही-योंग आणि किम हाय-जेओंग यांचा पराभव केला. आज त्यांचा सामना चीनच्या टॅन निंग आणि लिऊ शेंगशु या जोडीशी होईल. लक्ष्य सेन यानंही पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यानं गतविजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीचा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत आता सेनची लढत चीनच्य...

March 12, 2025 3:35 PM March 12, 2025 3:35 PM

views 14

ऑल इंग्लंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरूष एकेरीत एचएस प्रणॉयला आणि मिश्र दुहेरीत सतीश करुणाकरन आणि आद्या वरियथ या जोडीला पराभव पत्करावा लागला.   महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा मुकाबला हसीह पेई-शान आणि हंग एन-त्झू यांच्याशी होणार आहे. तसंच पीव्ही सिंधू महिला एकेरीचा सामना खेळेल तर सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीत खेळणार आहेत. महिला द...

March 7, 2025 2:56 PM March 7, 2025 2:56 PM

views 14

बॅडमिंटन: आयुष शेट्टी ऑर्लीन्स मास्टर्सच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचला

फ्रान्समध्ये सुरु असलेल्या ऑर्लिअन्स मास्टर्स सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या आयुष शेट्टीनं पुरुषांच्या एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत ४८व्या स्थानावर असणाऱ्या शेट्टीनं उपउपांत्यपूर्व फेरीत हाँगकाँगच्या खेळाडूचा २१-२७, २१-२७ असा सरळ गेममध्ये पराभव केला होता. आज संध्याकाळी त्याचा सामना डेन्मार्कच्या बॅडमिंटनपटू सोबत होणार आहे.  दरम्यान भारतीय बॅडमिंटनपटू एच एस प्रणॉय आणि किदंबी श्रीकांत यांना मात्र पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरी आपापल्या प्रतिस्पर्ध्याकडून ह...

March 5, 2025 9:52 AM March 5, 2025 9:52 AM

views 22

भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतचा पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश

भारताचा बँडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने फ्रान्समधील ऑर्लियन्स इथं झालेल्या दोन्ही पात्रता सामन्यांमध्ये विजय मिळवत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. श्रीकांतनं दोन सामन्यांमध्ये अनुक्रम मॅड्स क्रिस्टोफरसनचा आणि अर्नॉड मर्कलेचा असा पराभव केला. शंकर सुब्रमणियम यानेही मुख्य फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीच्या पात्रता फेरीत, तान्या हेमंतने तिचा पहिला सामना जिंकला पण दुसरा सामना गमावला. तिसऱ्या मानांकित आकर्शी कश्यपलाही पराभव पत्करावा लागला.