September 20, 2025 2:39 PM September 20, 2025 2:39 PM

views 15

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत दाखल

चीन मास्टर्स बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत, भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा सामना आज मलेशियन जोडी आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. कालच्या उपांत्यपूर्व फेरीत रेन झियांग यू आणि झी हाओनान या चिनी जोडीला पराभूत करून रँकीरेड्डी आणि शेट्टी यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला.  

September 9, 2025 3:23 PM September 9, 2025 3:23 PM

views 6

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा सामना लाईन क्रिस्टोफर बरोबर होणार

हाँगकाँग २०२५ च्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. ऑलम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूचा भारताच्या वतीनं पहिला सामना डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफर बरोबर खेळणार आहे.   भारताच्या एच.एस.प्रणोय आणि आयुष शेट्टीसह पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन सहभागी होणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचीही निवड करण्यात आली आहे.

July 16, 2025 2:34 PM July 16, 2025 2:34 PM

views 13

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही सिंधू वगळता भारतीय खेळाडूंची आगेकूच

जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताने चांगली सुरुवात केली. टोकियो इथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.   सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं दक्षिण कोरियाच्या कांग मिन हुक आणि किम डाँग यांचा पराभव करत शुभारंभाच्या सामन्यात जागतिक पातळीवरचं १५ वं स्थान पटकावलं. लक्ष्य सेन याने देखील चीनच्या वांग झेन्ग झिंग याचा पराभव केला.   मात्र, दोन...

January 14, 2025 1:36 PM January 14, 2025 1:36 PM

views 11

इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन : ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीचा १६व्या फेरीत प्रवेश

इंडिया ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या भारतीय जोडीने १६व्या फेरीत प्रवेश केला. त्यांनी तैवानच्या सू या चिंग आणि चेन चेंग कुआन या जोडीचा  ८-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला. या स्पर्धेच्या महिला दुहेरी प्रकारात अमृता प्रथमेश आणि सोनाली सिंग या भारतीय जोडीला मात्र थायलंडच्या ओर्निचा जोंगसाथापोर्नपार्न आणि सुकित्ता सुवाचाई या जोडीकडून पराभव पत्करावा लागला. महिला एकेरी प्रकाराची ३२वी पेरी आज होणार असून भारताची पी. व्ही. सिंधू तैवानच्या सुंग शु...

January 14, 2025 10:05 AM January 14, 2025 10:05 AM

views 10

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात

भारतीय खुल्या सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहेत. यामध्ये भारताच्या ३६ ऑलिंपिकपटूसह जगातल्या विविध देशांचे २०० खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत, पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर बऱ्याच कालावधीनंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधु या स्पर्धेत सहभागी होत असून तिचा आज पहिला महिला एकेरीचा सामना ताइवानच्या सुंग शुओ युन हिच्याशी होणार आहे.

January 8, 2025 4:35 PM January 8, 2025 4:35 PM

views 14

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या ४ खेळाडूंचा प्रवेश

क्वालालंपूर इथे सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा कॅस्ट्रो यांनी आज उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यांनी दक्षिण कोरियाच्या सुंग ह्युन को आणि हे वोन इओम यांचा २१-१३, २१-१४ असा सरळ गेममध्ये पराभव केला. आद्या वरियथ आणि सतीश करुणाकरन या अन्य एका भारतीय जोडीनेही मिश्र दुहेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.   त्यांनी आज भारताच्याच अमृता प्रथमेश आणि अशित सूर्या यांचा २१-१३, २१-१५ असा पराभव केला. दरम्यान, आजच्या अन...

November 28, 2024 3:19 PM November 28, 2024 3:19 PM

views 10

सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी.व्ही सिंधूसह ४ खेळाडू उपान्त्यपूर्व फेरीत दाखल

लखनौ इथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने भारताच्या इरा शर्मा हिचा २१-१०, १२-२१, २१-१५ असा पराभव केला. याच प्रकाराच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या उन्नती हुडा हिने पोर्नपिचा चोईकीवोंग हिचा २१-१८, २२-२० असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.   या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या मीराबा लुवांग मैसराम आणि आयुष शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश क...

September 4, 2024 1:58 PM September 4, 2024 1:58 PM

views 13

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांचा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. करुणाकरन याने थायलंडच्या कान्तफोन वांगच्यारोएन याचा २४-२२,२३-२१ असा सरळ गेम मध्ये  पराभव करत ही फेरी गाठली तर दुसऱ्या एका सामन्यात सुब्रमणियन याने ज्योकिम ओल्डरफ याला २१-१२, १९-२१, २१-११ असं नमवलं. दरम्यान, आकर्षि कश्यप, तानिया हेमंत, अनुपमा  उपाध्याय  या तीन महिला बॅडमिंटनपटू स्पर्धेतून बाद झाल्या.

August 22, 2024 1:37 PM August 22, 2024 1:37 PM

views 10

जपान खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या सतीश कुमारचा पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सतीश कुमार करुणाकरनने काल योकोहामा इथं पुरुष एकेरीच्या सोळाव्या फेरीत प्रवेश केला. आज सतीशचा सामना जागतिक क्रमवारीत चाळीसाव्या स्थानावर असलेल्या थायलंडच्या कांताफोन वांगचारोएन याच्याशी होईल. भारताच्या किरण जॉर्ज याला मात्र पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत जपानच्या कांता त्सुनेयामाकडून २१-१९, २१-१४ असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत बी. सुमीत रेड्डी आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली. ऋतुपर्णा पांडा आणि श्वेतपर्णा पांडा ...