November 22, 2025 3:25 PM November 22, 2025 3:25 PM

views 5

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेनची अंतिम फेरीत धडक

ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेननं पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिडनी इथं आज झालेल्या उपांत्य सामन्यात त्यानं तैवानच्या चाऊ तिएन-चेन ला १७-२१, २४-२२, २१-१६ असं हरवलं. जागतिक क्रमवारीत चाऊ तिएन चेन दुसऱ्या तर लक्ष्य सेन सातव्या स्थानावर आहे.

November 21, 2025 3:32 PM November 21, 2025 3:32 PM

views 6

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या  पुरुष एकेरी गटात  उपान्त्य  फेरीत पोहोचला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईचा चाऊ-तिएन-चेन बरोबर होईल. जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर लक्ष्य सेन सातव्या स्थानावर आहे.   पुरुष दुहेरीतली अग्रमानांकित जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपान्त्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.   एच. ए...

October 26, 2025 7:53 PM October 26, 2025 7:53 PM

views 24

Badminton U17 & U15: भारताची दोन सुवर्ण आणि एकेा रौप्य पदकाची कमाई

चीनमध्ये चेंगडू इथं झालेल्या बॅडमिंटन एशिया अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं मुलींच्या कनिष्ठ गटात एकेरीमधली दोन सुवर्णपदकं, आणि एक रौप्य पदक पटकावलं. १५ वर्षांखालच्या गटात शायना मणिमुथू हीनं जपानच्या चिहारू टोमिता हिला २१-१४, २२-२० असं नमवलं. १७ वर्षांखालच्या गटात दीक्षा सुधाकर हीनं अंतिम फेरीत भारताच्याच लक्ष्या राजेश हिला २१-१६, २१-९ असं हरवून सुवर्णपदक जिंकलं, तर लक्ष्या हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. बॅडमिंटन एशियामधली ही या दोन्ही वयोगटांमधली भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आह...

October 18, 2025 1:38 PM October 18, 2025 1:38 PM

views 177

भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार

डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना जपानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी या जोडीशी होणार आहे. काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सात्त्विक-चिराग जोडीनं इंडोनेशियाच्या जोडीवर २१-१५, १८-२१, २१-१६ अशी मात करून उपांत्य फेरीत धडक मारली. पुरुष एकेरीत मात्र लक्ष्य सेनला फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनिएर याच्याकडून ९-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला.

October 5, 2025 8:20 PM October 5, 2025 8:20 PM

views 46

अल ऐन मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पटकावलं विजेतेपद

अबू धाबी इथं सुरू असलेल्या अल ऐन मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू श्रियान्शी वलिशेट्टी हिनं महिला एकेरीचं, तर हरिहरन अम्साकरुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं, पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.  अंतिम फेरीत श्रियान्शीनं भारताच्याच तसनीम हिचा १५-२१, २२-२०,२२-२० असा ३ गेम्समध्ये पराभव केला. तर, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत हरिहरन अम्साकरुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं इंडोनेशियाच्या रेमंड इंद्रा आणि निकोलस जोक्विन जोडीला, २१-१७, २१-१८ असं हरवलं. 

September 21, 2025 2:38 PM September 21, 2025 2:38 PM

views 23

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश

चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश / आज सामना कोरियाशी चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. चीनमधे शेनझेन इथं, आज दुपारी होणाऱ्या अंतिम सामन्यात त्यांची लढत, कोरियन जोडीशी होणार आहे. किम वोन हो आणि सेओ सेऊंग जे ही कोरियन जोडी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असून विश्वविजेती देखील आहे. उपान्त्य फेरीत त्यांनी मलेशियाची ऑलिं...

September 13, 2025 8:35 PM September 13, 2025 8:35 PM

views 57

Hong kong Open: सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे.  आज सकाळी उपान्त्य फेरीत या जोडीनं चीन ताइपेच्या चेन चेंग कुआन आणि लिन बिंग वेई जोडीचा २१-१७, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.   अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लिआँग वेई केंग आणि वांग चेंग जोडीशी होणार आहे.   पुरुष एकेरीच्या उपान्त्य फेरीत आज संध्याकाळी लक्ष्य सेनची लढत चीन ताइपेच्या चोऊ तिएन चेनशी होणार आहे. लक्ष्यने काल उपान्त्यपूर्व सामन्यात भारताच्याच आयुष शेट्टीला ...

August 28, 2025 3:29 PM August 28, 2025 3:29 PM

views 14

पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंचं अंतिम १६ मध्ये स्थान

पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी काल अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने चिनी तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि यांग पो हान यांचा पराभव केला.   महिला एकेरीत पीव्ही सिंधूने मलेशियाच्या करुपथेवन लेत्शाना हिचा पराभव केला. मिश्र दुहेरीत, भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनी आयर्लंडच्या जोशुआ मॅगी आणि मोया रायन यांचा पराभव करून शेवटच्या १...

July 16, 2025 2:34 PM July 16, 2025 2:34 PM

views 13

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही सिंधू वगळता भारतीय खेळाडूंची आगेकूच

जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताने चांगली सुरुवात केली. टोकियो इथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.   सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं दक्षिण कोरियाच्या कांग मिन हुक आणि किम डाँग यांचा पराभव करत शुभारंभाच्या सामन्यात जागतिक पातळीवरचं १५ वं स्थान पटकावलं. लक्ष्य सेन याने देखील चीनच्या वांग झेन्ग झिंग याचा पराभव केला.   मात्र, दोन...

July 5, 2025 3:16 PM July 5, 2025 3:16 PM

views 18

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतचा उपांत्यफेरीत प्रवेश

कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं चमकदार खेळ करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चोऊ टीएन चेन चा केवळ ४३ मिनिटांत २१-१८, २१-९ असा सरळ सेट मध्ये  पराभव केला. उपांत्यफेरीत आज श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशिमोटो बरोबर होणार आहे.