November 20, 2025 11:25 AM November 20, 2025 11:25 AM

views 14

ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे.   सिडनी इथं काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या सु ली-यांगचा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं इंडोनेशियाच्या मार्सेलीनोचा पराभव केला.  

June 29, 2025 7:18 PM June 29, 2025 7:18 PM

views 43

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटात तन्वी शर्मा आणि पुरुष गटात आयुष शेट्टी यांच्या विजेतेपदांसाठी लढती

अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटात आयुष शेट्टीनं जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावरचा चोऊ तिएनचेन याला २१-२३, २१-१५, २१-१४ असं हरवून अंतिम फेरी गाठली आहे. विजेतेपदासाठी आज रात्री त्याची लढत तृतीय मानांकित कॅनेडियन खेळाडू ब्रायन यांगशी होणार आहे.. महिला एकेरीत तन्वी शर्माने उपान्त्य फेरीत काल युक्रेनच्या पोलिना बुरहोवाचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. आता तिचा सामना चीनच्या बेईवेन झांग बरोबर होणार आहे. सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता सुरू होईल.