February 26, 2025 1:22 PM February 26, 2025 1:22 PM
3
बदलापूर लैंगिक प्रकरण : आरोपीच्या मृत्यूप्रकरणात सहभागी पोलिसांना अंशतः दिलासा
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या कोठडीतल्या मृत्यूप्रकरणात सहभागी असलेल्या पाच पोलिसांना अंशतः दिलासा मिळाला आहे. दंडाधिकारी चौकशी अहवालातील काही निष्कर्ष सत्र न्यायालयानं तात्पुरते स्थगित केले आहेत. दंडाधिकारी अहवालातल्या विशिष्ट निष्कर्षांना स्थगिती दिली असून सीआयडीचा तपास स्वतंत्रपणे सुरू राहील, अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. आर. देशपांडे यांनी २१ फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. या प्रकरणाची पुढची सुनावणी ५ मार्च रोजी होणार आहे.