November 26, 2025 7:17 PM November 26, 2025 7:17 PM

views 23

पुण्यातल्या २ मेट्रो मार्गिका आणि बदलापूर – कर्जत दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिकांना मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळ स्टॉप ते माणिक बागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली. तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वेमार्गालाही मंजुरी दिली.   पुण्यातल्या ४ आणि ४ ए या नव्या मार्गिंकांसाठी एकूण ९ हजार ८५८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहेत. खडकवासला ते खराडी मार्गावर २२ तर नळ स्टॉप ते माणिक बागेच्या दरम्यान ६ मेट्रो स्थानकं असतील, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.   येत्या ५ वर्षात हे मार्ग पूर्ण करण्याच...