August 27, 2024 1:48 PM August 27, 2024 1:48 PM

views 12

बदलापूर प्रकरणाच्या चौकशी समितीचा प्राथमिक अहवाल महाराष्ट्र शासनाला सादर

महाराष्ट्रात बदलापूर इथल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या  पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने नेमलेल्या शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष यांच्या समितीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर झाला आहे. या अहवालातील निरीक्षणं तपास यंत्रणांना सादर करण्यात येणार असून शिक्षण विभागाअंतर्गत स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. दोषी ठरलेल्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांवर अन्याय टाळण्य...

August 22, 2024 7:05 PM August 22, 2024 7:05 PM

views 4

बदलापूरमधल्या लैैंगिक अत्याचार प्रकरणी राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

बदलापूरमधल्या शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची स्वतःहून दखल घेत मुंबई उच्‍च न्‍यायालयानं आज सुनावणी घेतली. या प्रकरणी पोलिसांनी त्यांची भूमिका बजावली नसल्याचं सांगत न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केली. लैंगिक अत्याचार झाला आहे याची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्‍हा दाखल करायला हवा होता, मात्र बदलापूरमधल्या जनक्षोभानंतरच पोलिसांनी कारवाई केली, असं न्यायालयानं म्हटलं आहे.  मोठा जनक्षोभ उसळल्याशिवाय यंत्रणा काम करत नाही, ही आता सामान्य बाब झाली आहे. लोकांना रस्त्यावर उतरुन आंदोल...

August 22, 2024 3:49 PM August 22, 2024 3:49 PM

views 11

बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा नाना पटोले यांचा आरोप

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातली संबधित शाळा भाजपा आणि आरएसएस विचारांची असल्यानं पोलिसांवर दबाब टाकण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते मुंबईत वार्ताहर  परिषदेत बोलत होते. शाळेच्या संस्था चालकांवर दबाव आणून १२ आणि १३ तारखेचे सीसीटीव्ही फूटेज गायब करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. २४ तारखेला महाविकास आघाडीच्या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

August 22, 2024 3:32 PM August 22, 2024 3:32 PM

views 9

राज्यात येत्या महिन्याभरात सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक

महाराष्ट्रात बदलापूर, आणि घाटकोपर मध्ये शालेय विद्यार्थ्यांवर झालेल्या  लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना लागू करण्याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. त्यानुसार सर्व शाळांसाठी येत्या एक महिन्यात शाळेच्या आवारात पुरेशा संख्येनं सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं बंधनकारक राहील. कंत्राटी पद्धतीनं कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना शाळांना अत्यंत दक्ष राहण्याचे आणि योग्य प्रक्रियेनंतर पोलिसांकडून त्यांची पडताळणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले...

August 21, 2024 7:39 PM August 21, 2024 7:39 PM

views 17

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय – राहुल गांधी

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे.  पश्चिम बंगाल, युपी, बिहारनंतर महाराष्ट्रातील मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाज म्हणून आपली वाटचाल कुठं होत आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे.  अल्पवयीन मुलींवर झालेल्या अन्यायाला दाद मिळवण्यासाठी  जनआंदोलन उभारावं लागलं. एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन का करावं लागतं, असा प्रश्न ही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर महिलांना सुरक्षित वाताव...

August 21, 2024 7:03 PM August 21, 2024 7:03 PM

views 15

बदलापूर इथं कालच्या आंदोलनानंतर परिस्थिती सुरळीत

बदलापूर इथं दोन लहान मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणी काल झालेल्या आंदोलनानंतर या भागातली परिस्थिती आणि रेल्वे वाहतूक सुरळीत असून अफवा पसरू नयेत, यासाठी काही दिवस इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी दिली आहे. बदलापूर आणि परिसरातल्या शाळा आज बंद आहेत.  रेल रोको आंदोलन करणाऱ्या ३०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २८ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी २२ जणांना न्यायालयानं १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. या पार्श्वभूमीवर ब...

August 21, 2024 3:26 PM August 21, 2024 3:26 PM

views 18

बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा राज्यात विविध ठिकाणी निषेध

बदलापूर इथं दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे पडसाद आज राज्यात विविध ठिकाणी उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी निदर्शन, आंदोलन केली जात आहेत. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आणि राज्य सरकारच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट इथं आज निदर्शनं केली. राज्यपालांनी राज्य सरकार बरखास्त करावं, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली.  ज्या शिक्षण संस्थेत ही घटना घडली त्याच्या पदाधिकाऱ्यांवर तसंच य...