January 20, 2025 3:38 PM January 20, 2025 3:38 PM

views 11

अक्षय शिंदेच्या मृत्यूला पोलीस जबाबदार असल्याचा न्यायालयीन चौकशी अहवालाचा निर्वाळा

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित एन्काउंटरमध्ये झालेल्या मृत्यूला पाच पोलीस कर्मचारीच जबाबदार असल्याचा निर्वाळा न्यायालयीन चौकशी अहवालात दिला आहे. हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाला आज सादर करण्यात आला. आरोपीशी झालेल्या झटापटीत या पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेला बळाचा वापर चुकीचा असून आरोपीच्या बोटांचे ठसेही बंदुकीवर आढळून आलेले नाहीत, असं अहवालात म्हटलं आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीवर गोळीबार केल्याचा दावा संशयास्पद असल्याचंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. आरो...

October 2, 2024 2:33 PM October 2, 2024 2:33 PM

views 8

अक्षय शिंदेच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूचा तपास करण्यासाठी न्यायिक आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालचा हा एक सदस्यीय आयोग या प्रकरणातली पोलिसांची भूमिका, तसंच इतर संबंधित बाबींचा तपास करेल. अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून रायगडला नेत असताना पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २३ सप्टेंबर रोजी तो ठार झाला होता.

September 27, 2024 7:31 PM September 27, 2024 7:31 PM

views 13

येत्या सोमवारपर्यंत अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणी अहवाल सादर करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचं दफन करावं आणि येत्या सोमवारपर्यंत त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.    आरोपी अक्षय शिंदे याचा गेल्या रविवारी पोलीस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचं दफन करायला स्थानिक रहिवाशांकडून प्रचंड विरोध झाला. त्याबाबत आरोपीच्या वडलांनी आज न्यायालयात दाद मागितली, तेव्हा दफनासाठी राज्यसरकार जागा उपलब्ध करुन देईल, असं सरकारी वकिलांनी सांगितलं. 

September 26, 2024 9:29 AM September 26, 2024 9:29 AM

views 11

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिस चकमकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाकडून शंका व्यक्त

बदलापूर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूच्या घटनेला चकमक मानणं शक्य नसल्याचं निरीक्षण, मुंबई उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या पीठानं काल झालेल्या सुनावणीत हे मत व्यक्त केलं. या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी अपेक्षित आहे, तशी ती होत नसल्याचं दिसलं, तर आम्हाला आदेश काढावा लागेल, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.

September 24, 2024 8:36 PM September 24, 2024 8:36 PM

views 11

बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू

बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट दिली. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे. भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायदाच्या अंतर्गत पोलिसांनी स्वतंत्र तक्रारींची नोंद केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार केला होता. दरम्यान, जे जे रुग्णालयात आज त्याच शवविच्छेदन झालं.