January 10, 2026 3:05 PM January 10, 2026 3:05 PM

views 84

तुषार आपटेचा ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षानं बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सह-आरोपी तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतल्या 'स्वीकृत' नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली होती.    भाजपाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत मुंबई काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आज मांडलं. तर, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या सह-आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला अ...

October 3, 2024 1:54 PM October 3, 2024 1:54 PM

views 24

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी  ठाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संबंधित शाळा आदर्श विद्यालय संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि कार्यवाह तुषार आपटे या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेनं कर्जतमधून ताब्यात घेतलं. या दोघांचा अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यांना नंतर विशेष तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितलं.  या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल न केल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकानं या...

October 1, 2024 8:39 PM October 1, 2024 8:39 PM

views 12

बदलापूर प्रकरण : संस्थेच्या विश्वस्तांना अटक न केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाची नाराजी

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या दोन आरोपींना पोलिसांनी अद्याप पकडलं नसल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.  या प्रकरणी स्वतःहून दखल घेऊन चालवलेल्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांच्या निष्क्रीयतेवर ताशेरे ओढले. या प्रकरणातले दोन आरोपी संबंधित शाळेचे विश्वस्त असून ते अद्याप फरार आहेत.    या आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर होण्याची वाट पहात आहात का असा सवाल खंडपीठानं पोलिसांना केला. विशेष तपास पथकाचे प्रमुख स...