August 21, 2024 8:32 AM August 21, 2024 8:32 AM
15
बदलापूर लैंगिक अत्याचार तपास प्रकरणी एसआयटीची स्थापना
ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधल्या आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांची देखील तत्काळ बदली करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अ...