October 28, 2025 8:24 PM October 28, 2025 8:24 PM

views 57

ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं निधन

ज्येष्ठ लेखक बाबू बिरादार यांचं आज नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. मराठी, उर्दू, कानडी, तेलगू, हिंदी या भाषा बोलणाऱ्या प्रदेशात राहून त्यांनी मराठीत लिखाण करून नावलौकिक मिळविला होता. बिरादार यांच्या मातीखालचे पाय, कावड, गोसावी, अग्निकाष्ठ, अंत:पुरूष, संभूती या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं.