March 6, 2025 9:19 AM March 6, 2025 9:19 AM

views 11

पाकिस्तानच्या बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या दहशतवाद्याला उत्तर प्रदेशात अटक

पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंध असलेल्या बब्बर खालसा इंटरनॅशनल (बीकेआय) च्या एका सक्रिय दहशतवाद्याला आज पहाटे उत्तर प्रदेश विशेष कृती दल आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत उत्तर प्रदेशातल्या कौशांबी जिल्ह्यातून अटक केली आहे. पंजाबमधील अमृतसरमधील रामदास भागातील कुर्लियन गावातील रहिवासी असलेला संशयित दहशतवादी लाजर मसीह बब्बर खालसा इंटरनॅशनलच्या जर्मनीस्थित गटाचा प्रमुख स्वर्ण सिंग उर्फ जीवन फौजीसाठी काम करतो आणि तो पाकिस्तानस्थित आयएसआय कार्यकर्त्यांशी थेट संपर्कात आहे. उत्तर प्रदेश पोलिसां...