November 30, 2024 7:43 PM November 30, 2024 7:43 PM

views 13

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी २६ आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी ताब्यात असलेल्या सर्व २६ आरोपींच्या विरोधात महाराष्ट्र राज्य पोलिसांनी मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आत्तापर्यंत मुख्य शूटर शिव कुमार गौतम सह एकूण २६ आरोपींना अटक केलेली असून या प्रकरणी अद्याप पुढील तपास सुरु आहे. मकोका अंतर्गत पोलिसांसमोर दिलेली जबानी न्यायालयात ग्राह्य धरली जाते. तसंच या गुन्ह्याखाली अटक केलेल्या आरोपींना जामीन मिळणं कठीण असतं. ६६ वर्षीय माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गेल्या महिन्याच्या १२ ऑक्टोबर ...

October 14, 2024 6:54 PM October 14, 2024 6:54 PM

views 13

सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी तिसऱ्या आरोपीला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. न्यायालयानं त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.  प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगनं घेतल्याची पोस्ट शुब्बू लोणकर या व्यक्तीनं त्याच्या अकाउंटवरून पोस्ट केली. या पोस्टमध्ये सलमान खान आणि दाऊद गँगचाही उल्लेख होता. पोलिसांनी या अकाऊंटचा शोध घेतला असता ते शुभम लोणकर याचेच असून त्यानंच ही पोस्ट लिहिली आहे.

October 14, 2024 3:36 PM October 14, 2024 3:36 PM

views 15

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार – मुख्यमंत्री

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं.   सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली. प्रवीणचा भाऊ शुभम फरार आहे. हे दोघंजण अकोल्यातल्या अकोट इथले रहिवासी आहेत. या दोघांनीच बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचल्याचा पोलिसांना संशय आहे. प्रवीण लोणकर याची मुंबई पोलिस चौकशी कर...