October 24, 2024 2:39 PM October 24, 2024 2:39 PM
7
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित प्रवीण लोणकरला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. प्रवीणचा लोणकरचा भाऊ शुभम हा अद्यापही फरार असून पोलिस त्याच्या शोधात आहेत. शुभमच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी काल चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं, तर पुण्यातून आणखी तिघांना काल रात्री ताब्यात घेतलं आहे.