October 21, 2024 3:30 PM

views 11

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दहाव्या आरोपीला अटक

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेनं दहाव्या आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी नवी मुंबईतील एक भंगार व्यापारी असून मुख्य आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

October 18, 2024 3:04 PM

views 14

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात लुक आऊट नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. यात शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांचा समावेश आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाची पथकं देशाच्या विविध भागात रवाना झाली आहेत.   दरम्यान,या प्रकरणातला एक आरोपी गुरमेल याच्या हरियाणातील कथैल गावातही मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे अधिकारी चौकशीसाठी गेले आहेत. तिथं त्याच्या मित्रांची सखोल चौकशी केली जा...

October 13, 2024 4:00 PM

views 46

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर बाबा यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाचा तपास आज सकाळपासून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सुरू केला आहे. पथकानं घटनास्थळाचा पंचनामा केला असून, ताब्यातील दोन आरोपींची चौकशी सुरू आहे. सिद्दीकी यांच्या हत्येचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.   या घटनेच्या पार्श...