December 9, 2025 9:41 AM December 9, 2025 9:41 AM

views 92

श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं पुण्यात वृद्धापकाळानं निधन

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज सकाळी 10 वाजता अंत्यदर्शनासाठी हमाल भवन इथं ठेवण्यात येईल. संध्याकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.   बाबा आढाव यांनी शेतमजूर, हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. हमाल पंचायत या संघट...

November 30, 2024 7:36 PM November 30, 2024 7:36 PM

views 6

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणाची सांगता

विधानसभा निवडणुकीसंदर्भात विविध गैरप्रकार झाल्याचा आरोप करत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांनी २८ नोव्हेंबर रोजी पुण्यात सुरु केलेल्या आत्मक्लेश उपोषणाची आज सांगता झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. आढाव यांचं आत्मक्लेश उपोषण  सुरू झालं होतं. महायुती सरकारने सार्वजनिक पैशांची उधळपट्टी केली, राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी आपलं उपोषण आहे, असं आढाव यावेळी म्हणाले.    विधानसभा निवडणूक प्रक्रियेवर, जिंकलेले आणि पराभूत अशा द...