May 25, 2025 3:32 PM May 25, 2025 3:32 PM
45
काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचा राजीनामा
नांदेड जिल्ह्यातले काँग्रेस नेते बी. आर. कदम यांनी जिल्हाध्यक्षपदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कदम यांनी आपला राजीनामा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सोपवला आहे. भाजपा नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नांदेड दौऱ्याच्या एक दिवस अगोदरच ही राजकीय घडामोडी जिल्ह्यात घडली आहे. चार दिवसांपूर्वीच कदम यांची माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. बी. आर.कदम यांनी पक्षात सुमारे ४० वर्षं काम केलं होतं.