April 28, 2025 1:10 PM April 28, 2025 1:10 PM

views 11

नवी दिल्लीत आजपासून आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेची सुरुवात

नवी दिल्लीत आज दिल्लीकरांसाठीच्या आयुष्मान वय वंदना कार्ड योजनेची सुरुवात केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या हस्ते झाली. या योजनेत ७० वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना ५ लाख रुपयांचं मोफत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. तसंच, यापूर्वी आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य विमा कवच मिळालेल्या ७० वर्षं आणि त्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या नागरिकांना दरवर्षी ५ वर्षांचं अतिरिक्त विमा कवचही मिळणार आहे.