May 29, 2025 3:36 PM May 29, 2025 3:36 PM

views 16

‘आयुष्मान भारत’ आरोग्य सेवा देणारा जगातला सर्वात मोठा कार्यक्रम – मंत्री जे. पी. नड्डा

आयुष्मान भारत हा आरोग्य सेवा देणारा जगातला सर्वात मोठा कार्यक्रम असून देशातल्या जवळजवळ ६२ कोटी नागरिकांनी त्याचा लाभ घेतल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. आयुष्मान भारत योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी ४० लाख इतकी रुग्णालय भर्ती सेवा पुरवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

April 11, 2025 1:32 PM April 11, 2025 1:32 PM

views 10

ओदिशात आजपासून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू

ओदिशात आजपासून सार्वत्रिक आरोग्यसेवा पुरवण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनधन आरोग्य योजना सुरू होत आहे.   केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा कटक इथं एका विशेष कार्यक्रमात या एकात्मिक आरोग्य विमा योजनेचा प्रारंभ करतील. ओदिशा सरकारच्या गोपबंधू जन आरोग्य योजना आणि आयुष्मान वयो वंदन योजनांचाही आयुष्मान भारत योजनेत समावेश केला जाणार आहे

March 27, 2025 1:37 PM March 27, 2025 1:37 PM

views 21

बालमृत्यू रोखण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्रांकडून प्रशंसा

आयुष्मान भारत सारख्या योजनांद्वारे भारताने बालमृत्यू रोखण्यासाठी केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात काढले आहेत. आरोग्य क्षेत्रात धोरणात्मक गुंतवणूक करून भारताने लाखो बालकांचे प्राण वाचवल्याचं या अहवालात म्हटलं आहे.   भारताने २००० पासून पाच वर्षांखालच्या बालकांच्या मृत्यूदरात ७० टक्के आणि नवजात बालकांच्या मृत्यूदरात ६१  टक्के घट करण्यात यश मिळवलं आहे. यासाठी आरोग्य सुविधांची व्याप्ती वाढवण्यात आली, पायाभूत सुविधा आणि संसाधनाच्या विकासासाठी उपाययोजना क...

November 30, 2024 11:37 AM November 30, 2024 11:37 AM

views 47

70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे १४ लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी

आयुष्मान भारत-पंतप्रधान जन आरोग्य योजनेंतर्गत या महिन्याच्या 25 तारखेपर्यंत 70 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सुमारे 14 लाख आयुष्मान वय वंदना कार्ड जारी करण्यात आल्याचं केंद्र सरकारनं म्हंटलं आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितलं की, या योजनेत आता 70 वर्षं किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतील ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी 5 लाखांपर्यंत मोफत उपचार दिले जातात. या योजनेअंतर्गत लाभार्थी कु...

September 23, 2024 11:41 AM September 23, 2024 11:41 AM

views 13

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज ६ वर्ष पूर्ण

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला आज सहा वर्ष पूर्ण झाली. पाच लाखांपर्यंतच्या मोफत आरोग्य विम्यासह, कौटुंबिक काळजी, महिलांची प्रतिष्ठा, मोठ्यांचा आदर, निरोगी आणि सुरक्षित भारताच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल मानलं जातं. आतापर्यंत जवळपास ४९ टक्के आयुष्मान कार्ड महिलांना वितरीत करण्यात आल्याचं सरकारने सांगितलं आहे. आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.