July 14, 2025 8:16 PM July 14, 2025 8:16 PM

views 13

आयुर्वेदाचं महत्व आता संपूर्ण जगाला पटू लागलं आहे – राज्यमंत्री प्रतापराव जाधव

आयुर्वेदाचा शास्त्रोक्त पाया, उपयोगिता तसंच संभाव्य क्षमतेचं महत्व आता संपूर्ण जगाला पटू लागलं असल्याचं प्रतिपादन आयुष विभागाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं आयोजित केलेल्या शल्यकॉन संमेलनात बोलत होते. आयुष मंत्रालय आयुर्वेदाला तसंच आयुर्वेदिक शल्य तंत्रांना  सातत्यानं  विकसित करण्यासाठी तसंच  त्यांना जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.

January 6, 2025 12:43 PM January 6, 2025 12:43 PM

views 11

जागतिक स्तरावर आरोग्याची राजधानी होण्याची भारताची क्षमता – प्रधानमंत्री

जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे, मेक इन इंडियाच्या धर्तीवर, जग लवकरच हील इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. दिल्लीत, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते काल दूरस्थ पद्धतीने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केलं असून, आयुष आणि ...

October 9, 2024 8:18 PM October 9, 2024 8:18 PM

views 6

आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

देशभरात पारंपरिक औषधांची उपलब्धता वाढवण्यासाठी आयुर्वेद औषध निर्मिती उद्योगात तरुणांनी सहभाग घेणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या ८व्या वर्धापन दिनानिमित्त त्या नवी दिल्ली इथं बोलत होत्या. आयुर्वेदिक महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी आनंद व्यक्त केला. देशात चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांची गरज असल्याचंही राष्ट्रपती मुर्मू यावेळी म्हणाल्या.