November 25, 2025 7:34 PM November 25, 2025 7:34 PM

views 59

अयोध्येतल्या श्रीराममंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं. राममंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे.   विवाह पंचमीच्या मुहुर्तावर होत असलेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त  देशभरातून हजारो भाविक अयोध्यानगरीत जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली. प्रधानमंत्र्यानी सप्तमंदिर,...

October 20, 2025 7:40 PM October 20, 2025 7:40 PM

views 8

अयोध्येतल्या दीपोत्सवाचा नवा विश्वविक्रम

अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला आणि यावेळी दोन गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले. शरयूतीरावर २६ लाख १७ हजार पणत्या लावण्यात आल्या, तर एकाच वेळी २ हजार १२८ भक्तांनी एकाच वेळी आरती म्हटली. या विश्वविक्रमाचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

January 11, 2025 2:51 PM January 11, 2025 2:51 PM

views 6

रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अयोध्येतल्या रामलल्ला अभिषेकाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. हे मंदिर शतकानुशतके बलिदान, तपश्चर्या आणि संघर्षानंतर बांधलं गेलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी याला आपल्या संस्कृतीचा आणि अध्यात्माचा महान वारसा, असंही म्हटलं आहे.   विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे दिव्य आणि भव्य राम मंदिर प्रेरणादायी ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप...

January 11, 2025 9:44 AM January 11, 2025 9:44 AM

views 10

राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचं तीन दिवसीय आयोजन

अयोध्येतल्या भव्य राम मंदिरात राम लल्लाच्या अभिषेक सोहळ्याचा आज वर्धापनदिन आहे. त्यानिमित्तानं तीन दिवसांचा भव्य उत्सव आजपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम जन्मभूमि मंदिराचं उद्घाटन झालं होतं, मात्र, पौष शुद्ध द्वादशी या तिथीनुसार आज प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा वर्धापनदिन साजरा केला जाणार आहे. तीन दिवसांत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे.

October 31, 2024 2:45 PM October 31, 2024 2:45 PM

views 9

अयोध्येत ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या उजळून सातवा गिनेस विश्वविक्रम

उत्तर प्रदेश सरकारनं काल उत्तर प्रदेशात अयोध्येतल्या ५५ घाटांवर २५ लाख १२ हजारपेक्षा जास्त पणत्या लावून सातवा गिनेस विश्वविक्रम नोंदवला. रामजन्मभूमी मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरचा हा पहिलाच दीपोत्सव होता. काल शरयूच्या घाटांवर एकाच वेळी १ हजार १२१ बटूंनी आरतीही करून आणखी एक विक्रम केला. अयोध्येतला हा दीपोत्सव फक्त अयोध्या किंवा उत्तर प्रदेशासाठी नव्हे तर संपूर्ण देश आणि जगासाठी उल्लेखनीय आयोजन असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.