October 19, 2025 8:24 PM

views 46

दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तिरावर आज २६ लाखापेक्षा जास्त दीप उजळणार

भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तरप्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून, यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या  ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक  प्रतिमा  जागतिक व्यासपीठावर उजळून निघेल. आज संध्याकाळी  स्थानिक प्रशासनानं आयोजित केलेली भव्य शरयू आरती या कार्यक्रमाच्या दिमाखात आणखी भर घालेल.   दरम्यान, काल दिल्लीत प्रथमच अयोध्येच्या...