June 27, 2025 11:00 AM June 27, 2025 11:00 AM
2
ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल
ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते; त्यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर होण्याचा...