June 27, 2025 11:00 AM June 27, 2025 11:00 AM

views 2

ॲक्सिओम फोर मोहिमेद्वारे शुभांशु शुक्ला यांच्या रूपानं पहिला भारतीय अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल

ॲक्सिओम फोर या मोहिमेअंतर्गत भारतीय वायू दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यासह 4 अंतराळवीरांना घेऊन निघालेलं स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान काल दुपारी 4 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलं. ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारे पहिले भारतीय ठरले आहेत. 1984 मध्ये राकेश शर्मा अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते; त्यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीर अंतराळात पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचणारा पहिला भारतीय अंतराळवीर होण्याचा...

June 18, 2025 2:30 PM June 18, 2025 2:30 PM

views 6

एक्सिऑम – फोर या अंतराळयानाचं उड्डाण येत्या २२ जूनला

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या एक्सिऑम - फोर या अंतराळयानाचं उड्डाण येत्या २२ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आलं आहे. नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेला अंतराळ प्रयोगशाळेच्या दुरुस्तीच्या कामाची तपासणी करायची असल्यानं हे उड्डाण पुढं ढकलण्यात आल्याचं ॲक्सिऑम स्पेस कंपनीनं म्हटलं आहे. नवीन तारीख, उड्डाणासाठीच्या सर्व निकषांची तपासणी करुन ठरवली असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी दिली आहे.