March 29, 2025 1:54 PM March 29, 2025 1:54 PM

views 11

आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक

जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालाने सुवर्णपदक जिंकलं आहे. तर अंतिम पंघालने कांस्यपदक मिळवलं आहे. महिलांच्या ६२ किलो वजनी गटात मनीषाने कोरियाच्या ओक जू किमचा ८-७ असा पराभव केला. दरम्यान, ५३ किलो गटाच्या अंतिम पंघालने तैपेईच्या मेंग एच हसीहचा एकही गुण न गमावता पराभव केला. भारतीय कुस्तीगीरांनी या स्पर्धेत आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. पुरुषांची फ्रीस्टाइल स्पर्धा आजपासून सुरू होत आहे.