August 31, 2024 1:02 PM August 31, 2024 1:02 PM
34
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन
पॅरिस पॅरालिम्पिक खेळांमध्ये महिलांच्या 10 मीटर एयर रायफल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत भारताचं नाव पदक विजेत्या देशांच्या यादीत झळकावल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नेमबाज अवनी लेखरा हिचं अभिनंदन केलं आहे. देशाला तिच्या ऐतिहासिक आणि असामान्य कामगिरीचा अभिमान असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे. पुरुषांच्या 10 मीटर एयर पिस्तुल स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या मनीष नरवाल यालाही राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या आहेत. मनीषच्या कामगिरीने नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळेल असं त्या म्हणाल्या. महिलांच्...