September 10, 2024 10:24 AM
19
स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट
स्वंयचलित वाहनांच्या सुट्या भागांची निर्यात १०० अब्ज डॉलर्सवर नेण्याच लक्ष्य भारत २०३० पर्यंत गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्ली इथं एसीएमए -अर्थात वाहनांच्या सुट्या भागांच्या कारखानदार संघटनेच्या वार्षिक अधिवेशनात बोलत होते. २०४७ पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याच्या ध्येयाशी सरकार, कटीबद्ध असून सामुहिक प्रयत्नांनी देशाची आर्थिक वाढ चालूच राहिल, असं ते म्हणाले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसादही यावेळी उपस...