November 2, 2025 6:49 PM November 2, 2025 6:49 PM

views 31

3rd T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय

भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. टीम डेव्हिडनं ७४, तर मार्कुस स्टॉइनिसनं ७४ धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंगनं ३, तर वरुण चक्रवर्तीनं २, तर शुभम दुबेनं एक गडी बाद केला.   भारतानं ५ गडी गमावून १८८ धावा करत, सामन्यातले ९ चेंडू बाकी असताना  विजयी लक्ष्य ...

October 29, 2025 1:32 PM October 29, 2025 1:32 PM

views 43

भारत – ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान टी-२० सामन्यांच्या क्रिकेट मालिकेतला आज पहिला सामना

क्रिकेटमध्ये, भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांदरम्यान ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कॅनबेरा इथं रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणेदोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा पराभवाचा सामना केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताचा संघ टी-२० मालिका जिंकायचं लक्ष्य ठेवून मैदानात उतरणार आहे.

November 19, 2024 3:44 PM November 19, 2024 3:44 PM

views 17

महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियाबरोबर होणाऱ्या महिला क्रिकेट एकदिवसीय मालिकेतून भारताची आघाडीची फलंदाज शफाली वर्मा हिला वगळलं आहे. या तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे. स्मृती मंधना ही उप कर्णधार आहे. वेगवान गोलंदाज हरलीन देओल दुखापतीतूून सावरली असून संघात परतली आहे, तर यास्तिका भाटिया आणि रिचा घोष या सोळा सदस्यांच्या संघात यष्टीरक्षक असतील.