July 10, 2024 1:51 PM

views 33

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांच्याशी व्हिएन्ना इथं भेट

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ऑस्ट्रियातल्या व्हिएन्ना इथं ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांची भेट घेतली. आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नेहॅमर यांनी स्वागत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. भारत-ऑस्ट्रियाची मैत्री आगामी काळात आणखी मजबूत होईल, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. ऑस्ट्रियाचे अध्यक्ष कार्ल नेहॅमर यांनीही या भेटी बाबत आनंद व्यक्त केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ऑस्ट्रियामध्ये स्वागत करणं ही आनंदाची आणि सन्मानाची बाब असल्याचं नेहॅमर य...

July 8, 2024 12:59 PM

views 43

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून 3 दिवसांच्या रशिया-ऑस्ट्रीया दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा दौरा या दोन्ही देशांबरोबच्या भारताची मैत्री अधिक मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे. त्याआधी विमानतळावरुन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, भारत आणि रशियामध्ये  गेल्या दहा वर्षात ऊर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि मनुष्यबळ क्षेत्रातली धोरणात्मक भागीदारी वाढली आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री रशियातल्या २२ व्...