December 14, 2025 8:15 PM December 14, 2025 8:15 PM

views 28

ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉण्डी समुद्रकिनाऱ्यावर झालेल्या गोळीबारात १२ जण ठार

ऑस्ट्रेलियात सिडनी इथल्या बॉण्डी समुद्रकिनाऱ्यावर आज  संध्याकाळी झालेल्या गोळीबारात एका हल्लेखोरासह १२ जण ठार  झाले. तर आणखी एका हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या हल्ल्यात  दोन पोलिस अधिकाऱ्यांसह २९ जण जखमी झाले आहेत. ही घटना  धक्कादायक आणि अत्यंत वेदनादायक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँटोनी अल्बानीस यांनी म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षात ऑस्ट्रेलियात निर्माण झालेल्या यहुदींविरोधी वातावरणाचा हा परिणाम असल्याचं मत  इस्रायलचे परराष्ट्र मंत्री गिडीयॉन  सार यांनी  व्यक्त केलं. हनुक्का या ...

December 10, 2025 2:53 PM December 10, 2025 2:53 PM

views 38

6 वर्ष खालील मुलांना समाजमाध्यमांचा वापर करण्यावर ऑस्ट्रेलिया सरकारची बंदी

    ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालच्या मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी लागू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी यंदा सप्टेंबर महिन्यात या बंदीविषयीची घोषणा केली होती. हा नियम आजपासून लागू झाला. आता या मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, थ्रेड्स, एक्स, स्नॅपचॅट, किक, रेडीट, टिकटॉक ही माध्यमं वापरता येणार नाहीत.     माहितीचा अतिरेकी वापर रोखणं, मानसिक ताण, एकटेपणा आणि अतिवापरामुळे होणाऱ्या नकारात्मक परिणामांपासून मुलांचं संरक्षण व्हावं या उद्देशाने ही बंदी घालण्यात आल...

February 7, 2025 5:28 PM February 7, 2025 5:28 PM

views 8

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत सामना

चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या उपान्त्य फेरीत आज साकेत मायनेणी आणि रामकुमार रामनाथन या जोडीचा सामना तैवानचा रे हो आणि ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू ख्रिस्तोफर रोमियोस या जोडीबरोबर होणार आहे. हा सामना दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. उपान्त्य फेरीतला दुसरा सामना जीवन नेंदुचियान आणि विजय प्रशांत या भारतीय जोडीचा सामना शिंतारो मोचीझुकी आणि कैतो युसुगी या जपानी जोडीबरोबर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडेचार वाजता सुरु होईल.

December 29, 2024 3:08 PM December 29, 2024 3:08 PM

views 13

भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण

भारत ऑस्ट्रेेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराला दोन वर्षं पूर्ण होत असताना, या दोन्ही देशांमध्ये परस्परसंबधातून व्यापारवृद्धी आणि आर्थिक विकास यांची यशस्वी वाटचाल सुरु असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या करारावर स्वाक्षरी झाल्यापासून, द्विपक्षीय व्यावसायिक व्यापारात दुप्पटीने वाढ झाली. या यशाच्या पायावर भारत-ऑस्ट्रेलिया सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य कराराची वाटचाल सुरु असून त्यासाठी आतापर्यंत यासाठी १० औपचारिक फेऱ्या आणि चर्चा झाल्या आहेत असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.