January 26, 2025 1:55 PM January 26, 2025 1:55 PM

views 3

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : पुरुष एकेरीच्या विजेतपदासाठी गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांची लढत

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत आज पुरुष एकेरीचा अंतिम सामना अग्रमानांकित आणि गतविजेता यानिक सिनर आणि जर्मनीचा अलेक्झांडर झ्वेरेव्ह यांच्यात होणार आहे.  महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात काल अमेरिकेच्या मॅडिनस कीज हिनं अग्रमानांकित अरीना साबालेंका हिला धक्का देत अजिंक्यपद पटकावलं. तिनं साबालेंकावर ६-३, २-६, ७-५ अशी मात केली. दुसरीकडे महिला दुहेरीत टेलर टाऊनसेंड आणि कॅटरीना सिनियाकोव्हा यांच्या जोडीनं सु वे शे आणि येलेना ऑस्टापेंको यांच्यावर ६-२, ६-७, ६-३ असा विजय मिळवला आणि जेतेपद पटकावलं.

January 25, 2025 3:35 PM January 25, 2025 3:35 PM

views 7

टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत आरिना साबालेंकाचा सामना थोड्याच वेळात होणार

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत  अव्वल मानांकित आरिना साबालेंका हिचा सामना अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिच्याशी थोड्याच वेळात होणार आहे. साबालेंकाने हा सामना जिंकला तर १९९९ नंतर ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सलग तिनदा जिंकणारी ती पहिला महिला खेळाडू ठरेल. दुसरीकडे मॅडिसन कीजला सात वर्षानंतर ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकण्याची संधी मिळाली आहे. २०१७ मध्ये तिचा अमेरिकेच्याच सलोन स्टीफन्स हिच्याकडून पराभव झाला होता.    पुरुष दुहेरीत ब्रिटनचा हेन्री पॅटन आणि फिनलंडचा हरी हेलिओ...

January 23, 2025 8:39 PM January 23, 2025 8:39 PM

views 4

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोलंडच्या इगा श्वियांतेकचा पराभव

पाचवेळची ग्रँडस्लॅम विजेती, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेली पोलंडची इगा श्वियांतेक हिला ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या मॅडिसन कीज हिनं अटीतटीच्या सामन्यात तिच्यावर ७-५, ६-१, ७-६ अशी मात केली. आता अंतिम फेरीत मॅडिसनचा सामना शनिवारी अग्रमानांकित अरीना सालाबेंका हिच्याशी होईल. सालाबेंका हिनं उपांत्य फेरीत स्पेनच्या पॉला बाडूसा हिचा ६-४, ६-२ असा सहज पराभव केला. दरम्यान, पुरुष एकेरीचे उपांत्य फेरीचे सामने उद्या होणार आहेत. यात सर्बियाचा ...