January 24, 2026 6:33 PM

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांब्री आणि त्याचा स्विडिश जोडीदार आंद्रे गोरान्सन यांचा चौथ्या फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा स्विडिश जोडीदार आंद्रे गोरान्सन यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ७-६, ६-३ असा विजय मिळवला. श्रीराम बालाजी आणि त्याच्या जोडीदाराला मात्र पराभव पत्करावा लागला.  दरम्यान, दोनवेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेली नाओमी ओसाका हिनं कमरेला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याची घोषणा केली.