November 20, 2025 11:25 AM November 20, 2025 11:25 AM
14
ऑस्ट्रेलियन बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
ऑस्ट्रेलियन खुल्या सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत लक्ष्य सेन आणि एचएस प्रणॉय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. सिडनी इथं काल झालेल्या सामन्यात लक्ष्य सेननं चिनी तैपेईच्या सु ली-यांगचा पराभव केला, तर एचएस प्रणॉयनं इंडोनेशियाच्या मार्सेलीनोचा पराभव केला.