November 21, 2025 3:32 PM

views 25

बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत दाखल

भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या  पुरुष एकेरी गटात  उपान्त्य  फेरीत पोहोचला आहे. उपान्त्यपूर्व फेरीत त्याने भारताच्याच आयुष शेट्टीचा २३-२१, २१-११ असा पराभव केला. उपान्त्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपेईचा चाऊ-तिएन-चेन बरोबर होईल. जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर लक्ष्य सेन सातव्या स्थानावर आहे.   पुरुष दुहेरीतली अग्रमानांकित जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना उपान्त्यपूर्व फेरीत इंडोनेशियाच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला.   एच. ए...

January 12, 2025 1:39 PM

views 24

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आजपासून मेलबर्नमध्ये सुरुवात

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेला आज मेलबर्नमध्ये सुरुवात होत आहे. भारताचा सुमित नागल आणि चेक रिपब्लिकचा तोमास महाच यांच्यामधल्या सामना आज संध्याकाळी साडेपाचला सुरु होईल. ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा ही टेनिस खेळातल्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक आहे.   यानिक सिन्नर, नोवाक जोकोविच, अलेक्झांडर झ्वरेव, कार्लोस अल्काराझ यांच्यांसारखे कसलेले खेळाडू यात खेळणार आहेत.