November 12, 2025 1:21 PM November 12, 2025 1:21 PM

views 43

मलबार २०२५ या इंडो – पॅसिफीक नौदल सरावात ऑस्ट्रेलिया सहभागी

मलबार २०२५ या इंडो – पॅसिफीक नौदल सरावात भारत,  जपान आणि अमेरिकेसह, ऑस्ट्रेलिया सहभागी झाला आहे. क्वाड देशांमधे समन्वय आणि कार्यक्षमता वाढवणं हे याचं उद्दिष्ट आहे. सुरक्षेपुढल्या आव्हानांचा पार्श्वभूमीवर प्रादेशिक भागीदारी वाढवणं गरजेचं आहे हे या सरावामुळे अधोरेखित झालं आहे, असं ऑस्ट्रेलियाचे संयुक्त सराव मोहिमेचे प्रमुख व्हाईस ऍडमिरल जस्टीन जोन्स यांनी सांगितलं. या मोहिमेमुळे सैन्यदलामधे परस्पर विश्वासाचं वातावरण तयार होईल, असंही ते म्हणाले.

November 8, 2025 2:48 PM November 8, 2025 2:48 PM

views 65

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट शेवटचा सामना ब्रिस्बेनमधे रंगणार

भारत-ऑस्ट्रेलिया टी २० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज ब्रिस्बेनमधे होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी पावणे दोन वाजता हा सामना सुरू होईल. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.  भारत या मालिकेत २-१ अशा गुणफरकाने आघाडीवर आहे.

October 31, 2025 7:03 PM October 31, 2025 7:03 PM

views 29

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांची हाराकिरी

मेलबर्न इथं झालेल्या दुसऱ्या टी-२० क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मात्र  भारताच्या फलंदाजांनी अक्षरशः हाराकिरी केली. अभिषेक शर्माच्या ६८ धावा केल्या. त्याखालोखाल हर्षित राणानं ३५ धावांचं योगदान दिलं. त्यांच्याव्यतिरिक्त भारताच्या इतर खेळाडूंना दोन अंकी धावा करता आल्या नाहीत. चार फलंदाज शून्यावर बाद झाले. त्यामुळे सामन्यातले ८ चेंडू बाकी असताना भारताचा डाव १२५ धावांवर आटोपला. ...

October 20, 2025 12:55 PM October 20, 2025 12:55 PM

views 52

ऑस्ट्रेलियाची भारतावर ७ गडी राखून मात

क्रिकेटमध्ये, पर्थ इथं भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं काल भारतावर ७ गडी राखून मात केली. पावसाच्या व्यत्ययामुळं सामना चार वेळा थांबवण्यात आला. वेळ कमी पडल्यामुळे सामना २६ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं २६ षटकांत ९ बाद १३६ धावा केल्या. डकवर्थ-लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १३१ धावांचं लक्ष्य होतं. ते त्यांनी २२व्या षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयामुळं तीन सामन्यांच्य...

September 21, 2025 8:06 PM September 21, 2025 8:06 PM

views 26

यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता

यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ निवेदनात ही घोषणा केली. शांतता आणि समाधानाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नि यांनी देशाच्या शांततेसाठी या मान्यतेला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी देखील संयुक्त निवेदनाद्वारे पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली.

September 21, 2025 9:32 AM September 21, 2025 9:32 AM

views 73

महिला क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघांमधला ५० षटकांचा तिसरा आणि निर्णायक सामना काल ऑस्ट्रेलियानं ४३ धावांनी जिंकला. तीन सामन्यांच्या या मालिकेतही ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं २-१ असा विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या महिला संघानं ४८ षटकांत सर्व गडी बाद ४१२ धावा केल्या. विजयासाठी ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाचे सर्व फलंदाज ३६९ धावांवर बाद झाले.  

June 13, 2025 10:11 AM June 13, 2025 10:11 AM

views 27

क्रिकेट – दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियाची 218 धावांची आघाडी

आयसीसी करंडक विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेतील लंडनमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 8 गडी बाद 144 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, पहिल्या डावात, दक्षिण आफ्रिकेचा संघ 138 धावांवर गारद झाला होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने सहा बळी घेतले होते.

May 6, 2025 1:24 PM May 6, 2025 1:24 PM

views 18

परदेशी बनावटीच्या चित्रपटांवरचं अमेरिकेचं शुल्क अन्यायकारक – ऑस्ट्रेलिया

परदेशी बनावटीच्या चित्रपटांवर अमेरिकेनं लावलेलं शुल्क अन्यायकारक असल्याचं ऑस्ट्रेलियाचे सामाजिक सेवा मंत्री अमांडा रिशवर्थ यांनी सांगितलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या चित्रपटांवर १०० टक्के शुल्क लावण्याची घोषणा केली होती. ऑस्ट्रेलियाच्या निवडणुकीत लेबर पक्षाच्या विजयानंतर प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी नवीन सरकार अमेरिकेसमोर शुल्कांविरोधात बाजू मांडेल असं म्हटलं आहे.

March 1, 2025 10:34 AM March 1, 2025 10:34 AM

views 36

आयसीसी करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत

आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काल सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.   अफगाणिस्तान संघानं दिलेलं 274 धावांचं आव्हान दिलं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलिया संघानं 12 षटकं आणि 5 चेंडूंत 109 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ गट अ विजय मिळवत उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.

January 5, 2025 9:31 AM January 5, 2025 9:31 AM

views 15

बॉर्डर-गावसकर चषक : क्रिकेट मालिकेतील पाचव्या सामन्यात भारताचं ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचं आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताचा दुसरा डाव 157 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियापुढे जिंकण्यासाठी 162 धावांचे आव्हान ठेवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलँड याने सर्वाधिक 6 बळी घेतले. भारताने कालच्या 6 बाद 129 धावांवरून आपला डाव सुरू केल्यानंतर भारताने केवळ 28 धावांची भर घातली.