January 3, 2025 1:43 PM January 3, 2025 1:43 PM

views 12

बॉर्डर- गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिला डाव १८५ धावांमधे आटोपला

बॉर्डर गावस्कर चषक भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया क्रिकेट कसोटी मालिकेत सिडनी इथं सुरू असलेल्या अखेरच्या सामन्यात भारताचा पहिल्या डाव १८५ धावांवर आटोपला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋषभ पंत ने सर्वाधिक ४० धावा केल्या तर रवींद्र जाडेजा ने २६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या बोलांड ने ३१ धावात ४ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरु झाला असून दिवसअखेर १ बाद ९ धावा झाल्या आहेत.  

December 5, 2024 3:36 PM December 5, 2024 3:36 PM

views 18

महिला क्रिकेट – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव

महिला क्रिकेटमधे, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या एकदिवसीय मालिकेत, आज ब्रिस्ब्रेन इथं झालेल्या पहिल्या सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताचा संघ ३५ व्या षटकातच १०० धावा करुन गारद झाला. मेगन स्कट हिनं पाच बळी घेतले. तर किम गर्थ, ऍश्ले गार्डनर, ऍनाबेल सुदरलँड आणि ऍलेना किंग यांनी प्रत्येकी एकबळी मिळवला.   ऑस्ट्रेलियानं सतराव्या षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या पार केली. जॉर्जिया ओलच्या नाबाद ४६, आणि फिबी लिचफिल्डच्या ३५ धावांच्या बळाव...