March 19, 2025 7:31 PM March 19, 2025 7:31 PM
9
औरंगजेब कबर प्रकरणी फहीम खान यांना अटक
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर सोमवारी नागपूर पोलिस ठाण्याबाहेर निदर्शनं केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते फहीम खान यांना अटक केल्याचं वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. दंगल भडकवण्यात खान यांची काही भूमिका होती का, याचा तपास सुरू असल्याचं पोलीस आयुक्त सिंगल यांनी सांगितलं.