December 13, 2025 8:12 PM December 13, 2025 8:12 PM
13
दिव्यांग अव्यंग विवाह योजनेच्या अनुदानात वाढ
दिव्यांग व्यक्तींना सामजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी दिव्यांग- अव्यंग विवाह प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुदानाच्या रकमेत त राज्यशासनाने वाढ केली आहे. दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज विधिमंडळात ही माहिती दिली. अशा जोडप्यांमधे एकजण दिव्यांग असल्यास दीड लाख रुपये, तर दोन्ही जोडीदार दिव्यांग असल्यास अडीच लाख रुपये अनुदान मिळेल. या योजनेकरता २४ कोटी रुपयांची वार्षिक आवर्ती तरतूद करण्यात आली आहे.