March 27, 2025 1:28 PM March 27, 2025 1:28 PM

views 3

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले

इस्रायली सैन्याने गाझापट्ट्यात हवाई आणि जमिनीवरचे हल्ले वाढवले असून १८ मार्चपासून ते आजपर्यंत ४३०हून अधिक ठिकाणांवर हल्ले झाल्याचं हमासच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. या हल्ल्यांमुळे दोन महिन्यांच्या युद्धबंदी कराराचं उल्लंघन झाल्याचंही हमासने म्हटलं आहे.   या हल्ल्यांमध्ये सुमारे ८३० जणांचा मृत्यू झाल्याचं गाझाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं असून या काळात कोणत्याही इस्रायली नागरिकाच्या मृत्युची नोंद नसल्याचंही म्हटलं आहे.   इस्रायलनेही गाझापट्ट्यातून येणारी १४ क्षेपणास्त...

March 18, 2025 8:43 PM March 18, 2025 8:43 PM

views 11

इस्राईलनं गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या ४०० वर

इस्राईलच्या हवाई दलानं काल रात्री गाझावर केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या नागरिकांची संख्या ४०० झाली आहे. पॅलेस्टाईनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते या हल्ल्यात ५०० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इस्राईल आणि हमास यांच्यातल्या संघर्ष विरामासंदर्भातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर हा हल्ला झाला. १९ जानेवारी दोघांनी संघर्ष विराम करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतरचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.

March 15, 2025 3:09 PM March 15, 2025 3:09 PM

views 7

जफर एक्सप्रेसवर हल्ला करून अपहरण केलेल्या सर्व २१४ ओलिसांची हत्या – बलोचिस्तान लिबरेशन

पाकिस्तानात जफर एक्सप्रेसवर हल्ला करून अपहरण केलेल्या सर्व २१४ ओलिसांची हत्या केल्याचा दावा बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं केला आहे. ओलीस आणि कैद्यांच्या सुटकेसाठी दिलेली ४८ तासांची मुदत पाकिस्ताननं पाळला नाही असा दावा संघटनेचे प्रवक्ते जीयांद बलोच यांनी केला आहे.   बलोचिस्तान लिबरेशन आर्मीनं कायमच आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन केल्याचा, मात्र पाकिस्तानच्या हटवादी भूमिकेमुळं ओलिसांची हत्या केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी, या घटनेत अपहरण झालेल्या किमान ३४६ ओलिसांची सुटका केल्याचा आणि स...

February 20, 2025 1:12 PM February 20, 2025 1:12 PM

views 17

मणिपूरमधे ४ दहशतवाद्यांना अटक

मणिपूरमधल्या चुराचंदपूर, थौबल आणि इम्फाळ पूर्व जिल्ह्यातून दोन वेगवेगळ्या संघटनाच्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली आहे. यातला एक जण युनायटेड कुकी नॅशनल आर्मीचा सदस्य आहे, तर बाकीचे तिघं कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टीचे सदस्य असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी मागच्या दोन दिवसांत शस्रास्त्र आणि दारूगोळा जप्त केला आहे.

January 19, 2025 8:16 PM January 19, 2025 8:16 PM

views 15

सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांग्लादेशी असल्याचा संशय आहे. त्याने आधी आपलं नाव विजय दास असं सांगितलं होतं, पण पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याचं खरं नाव समोर आलं.    प्राथमिक पुरावे आणि त्याच्याकडे आढळलेल्या काही गोष्टींवरून तो बांग्लादेशचा नागरिक असल्याची शक्यता दिसत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेचे ...

January 18, 2025 8:31 PM January 18, 2025 8:31 PM

views 8

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणी एकाला अटक

अभिनेता सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी रेल्वे पोलिसांनी छत्तीसगडमधील दुर्गमधून एकाला अटक केली आहे. दुर्ग रेल्वे स्थानकावरुन त्याला ताब्यात घेतलं. रात्रीपर्यंत मुंबई पोलीस तिथे पोहोचून त्याची चौकशी करतील आणि त्याचा ताबा घेतील.

January 16, 2025 8:25 PM January 16, 2025 8:25 PM

views 17

सैफ अली खानची प्रकृती स्थिर, आरोपीच्या शोधासाठी १० पथकांची स्थापना

अभिनेता सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पहाटे मुंबईतल्या घरी अज्ञात इसमानं त्याच्यावर चाकू हल्ला केला होता. त्यात त्याला ६ ठिकाणी जखमा झाल्या होत्या, त्यातल्या २ जखमा खोल आहेत. त्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यात मणक्यातून चाकूचा तुकडा डॉक्टरांनी बाहेर काढला.    या प्रकरणी एका व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण...

October 6, 2024 3:48 PM October 6, 2024 3:48 PM

views 21

हमास दहशतवादी हल्ल्यास एक वर्ष पूर्ण

गाझा पट्ट्यात हमास या अतिरेकी संघटनेनं इस्त्राईलवर हल्ला केला त्यास आज एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्लयात इस्‍त्राईलच्या १२०० नागरिकांचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे. त्यात आतापर्यंत ४१ हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावला आहे. संयुक्‍त राष्ट्र संघाचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी हमास संघटनेनं ओलीस ठेवलेल्या इस्‍त्रायली नागरिकांची विनाशर्त सुटका करण्याचं आवाहन केलं आहे. या युद्धामध्ये आता लेबनॉनसह इराणही सहभागी झाल्यामुळं त्याची व्याप्ती दिवसेंदिव...

August 4, 2024 8:05 PM August 4, 2024 8:05 PM

views 12

मध्य प्रदेशात मंदिराची भींत कोसळून ९ लहान मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशात, सागर जिल्ह्यातल्या शहापूर इथं आज सकाळी धार्मिक उत्सवादरम्यान हर्दूल बाबा मंदिराची भींत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले आहेत. भिंतीखाली अडकलेल्या मुलांना बाहेर काढलं आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून, मृत्यूमुखी पडलेल्या मुलांच्या  कुटुंबांना प्रत्येकी ४ लाख रुपये मदत जाहीर  केली आहे.