November 16, 2025 4:20 PM November 16, 2025 4:20 PM
15
टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत अग्रमानांकित कार्लोस अल्काराजसमोर यानिक सिनर याचं आव्हान
टेनिसमध्ये एटीपी फायनल अजिंक्यपद स्पर्धेत आज अग्रमानांकित कार्लोस अल्काराज याच्यासमोर यानिक सिनर याचं आव्हान असेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेदहा वाजता हा सामना ट्युरिन इथं सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात कार्लोस अल्काराज यानं फीलिक्स ऑजर अलियासीम याच्यावर ६-२, ६-४ अशी मात केली होती, तर यानिक सिनर यानं ॲलेक्स डीमिनॉर याचा ७-५, ६-२ असा पराभव केला होता. अल्काराज आणि सिनर या दोघांनीही टेनिसच्या या हंगामात आपलं वर्चस्व कायम राखलं आहे.