November 3, 2024 2:54 PM November 3, 2024 2:54 PM
27
एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय – फ्रेंच जोडीला दुहेरीचं विजेतेपद
काँगोमध्ये सुरु असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय - फ्रेंच जोडीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी इटलीच्या सिमोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या अॅलेक बेकली या जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हे या जोडीचं पहिलं व्यावसायिक विजेतेपद ठरलं आहे. या विजेतेपदासोबतच करण यानं क्रमवारीतही पहिल्या पाचशे जणांमध्ये स्थान मिळवलं आहे.