November 3, 2024 2:50 PM

views 11

स्विस ओपन इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अतनू दासची कांस्यपदकाची कमाई

स्वित्झर्लंडच्या लूजान इथं झालेल्या स्विस ओपन इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अतनू दास यानं कांस्यपदकाची कमाई केली. ऑलिम्पिकपटू असलेल्या अतनू यानं पुरुषांच्या रिकर्व्ह प्रकारात कांस्यपदकासाठीच्या सामन्यात स्वित्झर्लंडच्या थॉमस रूफर याचा ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत अतनूला फ्रान्सच्या रोमेन फिचेट यानं ६-४ असं हरवलं होतं.