March 28, 2025 8:42 PM March 28, 2025 8:42 PM

views 2

ATM मधून पैसे काढणं महागणार !

एटीएममधून दर महिन्याला ठराविक वेळा पैसे काढल्यानंतर आणखी पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात १ मेपासून दोन रुपयांनी वाढ करायची परवानगी भारतीय रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिली आहे. सध्या हे शुल्क प्रति व्यवहार २१ रुपये अशी आहे. बँका आता ती वाढवून २३ रुपयांपर्यंत नेऊ शकतात, असं रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकात म्हटलं आहे. सध्या ग्राहकांना त्यांच्या बँकांच्या एटीएममधून दर महिन्याला पाच वेळा निःशुल्क व्यवहार करता येतात. तसंच इतर बँकांच्या एटीएममधून महानगरांमध्ये तीनदा, तर इतर शहरांमध्ये पाच वेळा कोणत...

August 12, 2024 4:01 PM August 12, 2024 4:01 PM

views 16

एटीएम चोरट्याना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

सिंधुदुर्ग जिल्हयात कुडाळ खरेदी विक्री संघाच्या आवारात एटीएम फोडून रोकड रक्कम चोरताना कुडाळ पोलिसांनी दोन चोरटयांना रंगेहाथ पकडलं. एक चोर एटीएम मध्ये चोरी करतानाच सापडला, तर दुसऱ्याला पणदूर इथं पोलिसांनी पकडलं. एकूण चौघेजण या चोरीत सहभागी होते, पण दोघे पळून गेले. त्यांच्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. या प्रकरणी १२ लाख ६५ हजार ९०० रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली असून अटक केलेल्या दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.