October 8, 2024 8:49 PM October 8, 2024 8:49 PM

views 2

अटल पेन्शन योजनेअंतर्गत आतापर्यंत ५६ लाखांहून अधिक नोंदणी

अटल पेन्शन योजने अंतर्गत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ५६ लाखांपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली आहे. निवृत्ती वेतन नियामक आणि विकास प्राधिकरणानं आज ही आकडेवारी जारी केली. या योजने अंतर्गत मासिक चार ते पाच हजार रुपये निवृत्ती वेतन मिळतं. २०१५ मध्ये विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशानं ही योजना सुरू करण्यात आली होती.