September 17, 2024 10:11 AM September 17, 2024 10:11 AM
9
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्हताप्राप्त परीक्षार्थींनी 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं केलं आहे. ही परीक्षा 10 नोव्हेंबर रोजी दोन सत्रात होणार आहे. सर्व शाळांमधल्या पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षण सेवक, शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे. अधिक माहिती परीक्षा परिषदेच्या https://mahatet.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचं परिषदेचे उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी कळवलं आहे.