December 9, 2024 3:52 PM December 9, 2024 3:52 PM

views 12

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याविरोधात अन्य कोणीही उमेदवार नसल्याने हा प्रस्ताव सभागृहाने आवाजी मतदानानं मंजूर केला.    त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांनी तसंच जयंत पाटील  आणि नाना पटोले यांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर ...